Nirankari-song- lyrics

Nirankari-song- lyrics-आणि बरच काही

Thursday, July 28, 2022

33 कोटी देव आहेत तरी कोण?- अनमोल विचार.

 





तुम्हालाही कधी ना कधी असा एक प्रश्न पडला असेल. या जगतामध्ये देवाचे स्वरूप काय आहे व कसे आहे. असे मानले जाते. जाते की या जगामध्ये एकूण 33 कोटी देव आहेत. माता हा नेहमी प्रश्नपत्रिका आहेत तरी कोण. तर मित्रांनो चला पाहूया आपण की  नेमके 33 कोटी देव आहेत तरी कोण ?.......


तेहतीस कोटी देव कोणते?



. 33 कोटी याचा अर्थ 33 करोड असे बहुतेकांना वाटत असते. पण मराठीमध्ये कोटीला करोड समजले जाते. परंतु संस्कृतमध्ये खोटी या शब्दाचा अर्थ करोड नसून प्रकार असा आहे याचा अर्थ असा की शास्त्र पुराणानुसार कल्पना अशी आहे की परमात्म्याने निसर्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी 33 देवांना कार्यभार सोपवले आहेत.
अनमोल विचार




त्याच्यात ८ वसु,११ रुद्र, १२ आदित्य, १ इंद्र आणि १ प्रजापती असे ३३ देवांचे पाच सर्वत्र आहेत. प्रत्येकाला वेगळी कोटी (दर्जा) दिलेली आहे.


(१) अष्टवसुंची नावे: आप,ध्रुव, सोम, धर, अनिल,अनल, प्रत्युक्ष,आणि  प्रभास

(२) अकरा रुद्रांची नावे: मनू, मन्यू, महत, शिव, ऋतुध्वज. महिनस, उम्रतेरस, काल, वामदेव, भव, आणि धृत -ध्वज.

(३) बार आदित्यांची नावे: आयुष्यमान,अर्यमन, इंद्र, त्वष्टा, धानु, प्रर्न्यज, पुषण, भग, मित्र, वरूण,वैवस्वत,व विष्णू.

१ इंद्र किंवा आकाश
१ प्रजापती किंवा ब्रह्मा


असे एकंदर ३३ कोटी म्हणजे ३३  प्रकारचे देवा असले तरी या सर्वांचा जो निर्माता आहे, ज्याची सत्ता शक्ती सर्वांमध्ये कार्यरत आहे. सन निर्गुण निराकार परमात्मा केवळ आणि केवळ एकच आहे. या परमात्म्याशिवाय ब्रम्हांडात काहीच नाही. आणि हा देव म्हणजेच निर्गुण निराकार परमात्मा सर्वांमध्ये व्याप्त आहे कणाकणात आहे याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे.


ही जर माहिती आपणास आवडली असेल तरी माहिती सर्वांना शेअर करा आणि आमच्या वेबसाईटला सबस्क्राईब करा





धन्यवाद!

No comments:

Post a Comment