अशी भेटली गुरुमाई
![]() |
अशी भेटली गुरुमाई |
अशी भेटली गुरुमाई
फळा आली हो पुण्याई
तारी येले माझी या जीवा
तेवविला ज्ञान दिवा
भटकत होतो मी असा दारोदारी
अवगुन अज्ञानाच्या घोर अंधारी
दिला ज्ञानाचा प्रकाश नवा
भवभय अरिष्ट दुःख दूर ते पळाले
अभय गुरुची ऐसे मजला मिळाले
भवरोगावर मिळाली दवा
एकनाथा गुरु केवळ ज्ञानाचा राजा
महाप्रकाश आहे गुरुदेव माझा
त्या प्रकाशाचा मी काजवा
No comments:
Post a Comment