जगी कितीही धुंडला तरी देव तुला मिळणार नाय -lyrics-मराठी
![]() |
निराकारी मराठी गीत-lyrics |
जगी कितीही धुंडला तरी
देव तुला मिळणार नाय
गुरु विना हा कळणार नाय ॥धृ॥
देव तुझ्या तो अगसंग हा
तुला हा कळणार नाय
तरले जगी ते संत अनेक
धरूनी गुरुचे पाय ॥१॥
संत तुक्याचे अभंग वाणी
कधी तू ऐकलीस काय
देवनिवासी मंदिर आहे
कधी तू पाहिलीस काय ॥२॥
राम हा प्रभू असुनी त्याला
कळला नव्हता राम
वशिष्ठाची शरण जाऊन
नाव याच जगात हाय ॥३॥
धावुनी कोठे मृगजळामागे
क्षणिक जादु ही हाय
पाहून घे तु खऱ्या देवाला
विश्वव्यापक हाय ॥४॥
Dhan Nirankar ji
No comments:
Post a Comment